सा. ‘विवेक’तर्फे काही दिवसांपूर्वी ‘घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं’ ही १० भागांतील लेखमालिका दररोज एक याप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली. गुंतवणूक सल्लागार व शेअर मार्केटचे अभ्यासक अमित पेंढारकर यांनी यामध्ये लेखन केलं. लॉकडाऊनच्या या काळात गेल्या महिन्याभरापासून आपल्यापैकी अनेकजण घरी बसले आहेत, काहींना ‘वर्क फ्रॉम होम’ करावं लागत आहे. त्यामुळे साहजिकच, रिकामा वेळ बराच मिळतोय आणि त्याचं काय करावं, हा अनेकांपुढे मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत, या वेळेचा सदुपयोग करून शेअर मार्केटचं विश्व समजून घेता यावं, ज्यांना याबाबत फारशी माहिती नाही किंवा कधी संबंधच आला नाही त्यांना मुळापासून हा सर्व विषय समजून घेता यावा आणि काहीतरी रिकामा उद्योग करत बसण्यापेक्षा आपल्याच आर्थिक भविष्याच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने काही मूलभूत अभ्यास व्हावा, हा या लेखमालिकेचा उद्देश होता.

या लेखांना चांगलाच प्रतिसादही मिळाला. अगदी सेन्सेक्स वा निफ्टी म्हणजे काय इथपासून सर्व संकल्पना, विश्लषणाच्या पद्धती इ. यात अत्यंत साध्यासोप्या भाषेत सांगण्यात आलं. त्यामुळे हे सर्व दहाच्या दहा भाग एकत्र द्या, अशीही मागणी अनेकांनी केली. त्यानुसार, सर्व भागांच्या लिंक्स इथे एकत्र देत आहे. आपण यातील लेख वाचले नसल्यास जरूर वाचा व आपल्या मित्रपरिवारातही ही लेखमालिका facebook / whatsapp द्वारे अवश्य शेअर / फॉरवर्ड करा.

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं
कोरोनाच्या संकटामुळे आज जवळपास सारं जग ठप्प झालंय. अत्यावश्यक सेवा वगळता आपण सारेच ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये आहोत. थोडक्यात, ‘घरी बसलोय’! आपला वेळ जात नाहीये, म्हणून कुणी फेसबुकवर मिम्स करत बसलंय Read More
सेन्सेक्स, निफ्टी आणि ‘सेक्टोरल इंडेक्स
जसा निफ्टी हा मुख्य निर्देशांक असतो, त्याप्रमाणे त्याचे काही उपनिर्देशांकही असतात, उदा. निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा, निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप ५० वगैरे या निर्देशांकांना ‘सेक्टोरल इंडेक्स’ म्हणतात Read More
लार्ज, स्मॉल आणि मिडकॅप – संधी आणि जोखमीचा खेळ
‘इन्फोसिस’ ही कंपनी १९९४ साली स्मॉल कॅप होती. परंतु पुढील १० वर्षांत हीच कंपनी लार्ज कॅप झालीदेखील. दुसरीकडे, या उदाहरणाच्या अगदी उलटही वाटचाल शेअर बाजारात होऊ शकते. म्हणजे एखादी लार्ज कॅप कंपनी स्मॉल कॅपही होऊ शकते. Read More
छोटी छोटी, मगर मोटी बातें!
कंपनीने ‘२:१’ या प्रमाणात बक्षीस समभाग (Bonus Shares) जाहीर केला तर याचा अर्थ असा की, प्रत्येकी १ शेअरमागे २ बोनस शेअर्स मिळतील. या ‘२:१’ अशा गुणोत्तरातला पहिला आकडा हा नेहमी बक्षीस समभागाचा असतो आणि गुणोत्तराप्रमाणे Read More
शेअर बाजार आणि ‘Long Term’ उद्दिष्टांची गुंतवणूक

आपल्यापैकी बरेच जण गुंतवणूक (Investment) आणि बचत (Saving) यांमध्ये गल्लत करतात. गुंतवणूक ही दीर्घ मुदतीच्या (Long Term) उद्दिष्टांसाठी करतात, तर बचत (Saving) प्रामुख्याने अल्प मुदतीच्या उद्दिष्टासाठी करतात.
Read More

शेअर बाजार विश्लेषणाच्या पद्धती
Qualitative Analysis मध्ये कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे, त्यांची विश्वासार्हता ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासली जाते. उदा. व्यवस्थापनाचे छोट्या भागधारकांप्रती काय धोरण आहे, तसेच आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रती त्यांचं वर्तन कसं आहे Read More
ये प्रॉफिट की बात हैं..!
जरी आपल्याला ब्रिटानिया कंपनीच्या Adjusted Net Profit मध्ये २०११ या वर्षी घट दिसत असेल तरी त्याच्या आधीचे सर्व आकडे हे उत्कृष्ट आहेत. आता याप्रमाणेच जर आपण पुढील आकडे बघितले, तर २०१५ पर्यंतच्या प्रत्येक वर्षाच्या Operating Profit आणि Read More
शेअर  बाजार आणि रेशो अ‍ॅनालिसिस
जर एखाद्या शेअरची शेअर बाजारातील किमंत १०० आहे व Earning Price of Share ही १० असेल, तर त्या कंपनीचा ‘पी/ई रेशो’ हा १० असेल. याचा अर्थ असा की, जर आपण १०० रुपये या शेअरमध्ये गुंतवले तर १०० रूपये परत मिळायला १० वर्षे लागतील! Read More
शेअर बाजाराच्या ‘चार्ट्स’ची भाषा..
मूलभूत विश्लेषण तसं बरंच अवघड आहे व तेही आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून करणं अधिकच अवघड आहे. दुसरीकडे, तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे त्या तुलनेनं पटकन आत्मसात करता येतं. Read More
नॉलेज, पेशन्स, मनी..!
‘Timing is not important in Share Market, Spending Time in Share Market is very important.’ आपण आपल्या गुंतवणुकीला शेअर बाजारात किती वेळ देतो, यावर आणि आपण निवडलेले शेअर्स हे योग्य आहेत की नाही, यावर Read More
अस्थिर निर्देशांकांच्या पार्श्वभूमीवर…
निफ्टीची या आठवड्यातील उलाढाल आपल्याला एक Range दाखवते आहे. ही रेंज म्हणजे, ९५८६.२५ जो त्या रेंजचा Resistence आहे आणि ९०४८.१३ जो त्या रेंजचा Support आहे. म्हणजेच, ही रेंज ज्या दिशेला तोडली जाईल. Read More
आगामी काळ तेजीचा?
निफ्टीच्या DownTrend Channel च्या बाहेर प्राईजने ब्रेक आऊट दिलेला आहे. तसेच प्राईज ही २० आणि ५० दिवसांच्या चलत सरासरीच्या वर बंद झाली आहे. या प्रकारच्या संकेताला तांत्रिक विश्लेषणामध्ये प्राईज क्रॉसओव्हर (Price Crossover) म्हणतात. Read More
निफ्टीचा डाऊनट्रेंड सुरूच, करा या गोष्टी..
ल्युपिनच्या वीकली टाइम फ्रेम चार्टनुसार असं दिसून येतं की, ऑक्टोबर, २०१५ ते एप्रिल, २०२० या काळातील Downtrend Line तोडून शेअर चांगलाच वर उसळून बंद झाला आहे. तसेच Price ही २० आणि ५० आठवड्याच्या चलत सरासरीच्या वर Read More
आता पुढचा अडथळाही पार करणार?
मागील लेख लिहीत असताना जे लक्ष्य निफ्टीसाठी सांगितलं होते, त्याची पूर्तता सोमवार, दि. ०१ जूनलाच झाली व निफ्टी त्याच आठवड्यात १०१६८.२० वर बंद झाला. आता जे दुसरं १०६०० चं लक्ष्य सांगितलं होते म्हणजेच १०६००, त्याकडे आता Read More